तुझा आवाज... (एक भास... )
तुझा आवाज...!
सर्वत्र शांतता असतांना सुद्धा जो ऐकू येतो तो फक्त,
तुझा आवाज..!
माझ्या हसण्यातून ...माझ्या बोलण्यातून...,
माझ्या श्वासातून... तर माझ्या अबोल्यातूनही व्यक्त होणारा तो फक्त,
तुझा आवाज ..!
मध्यरात्री...तलावाकाठी काजवे जसे अधे मधे चमकतात ना ?
अगदी तशीच मीही तुझ्या सहवासातील एक एक आठवनीनसरशी चमकून उठते.
कधी इथे तर कधी तिथे. जणू तुझ्याच आठवांचे टीमटीमनारे ठसे .
मीही तरंगते हळुवार. अलगद उडते काळोखात. एक एक आठवणी उजाळत असते.
पण ते लुकलुकणारे क्षण लुप्त होतात. हरवून जातात एका क्षणात.
मग उरतो तो फक्त अंधार. पुन्हा ती एक भयाण शांतता.
मला जाणीव होते अस्तित्वची. मी भाणावर येते .
मन कावर बावर होत. छातीत धडधडायला लागत.
तेव्हा ऐकू येतो तो फक्त चुकलेल्या ठोक्यांच आवाज ...
माझ्या असण्याचा नि तुझा नसण्याचा आवाज ...
तुझा आवाज ..!
जीव घेणा असतो रे तो क्षण!!
ज्या क्षणात मी माझ अस्तित्व हरवून बसलेली असते ना.. ?
नेमक त्याच...त्याच क्षणी तू माझ्या सोबत असतो.
तुझ अस्तित्व हे माझ्यात सामावलेलं असत.
तो क्षण जेव्हा अचानक नाहीसा होतो ना ?
त्याची जाणीव करून देणारा, एकट एकट पडणारा,
त्या चुकलेल्या थोक्याचा आवाज,
म्हणजे फक्त आणि फक्त,
तुझा आवाज ..! तुझा आवाज .....!!
Mahiya.

No comments:
Post a Comment